जर तुम्ही १९८३ वर्ल्डकपची इंडिया विरुद्ध झिम्बाबे हा सामना बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की, कपिल देव यांनी या सामन्यात १७५ रन करून विश्वविक्रम केला होता. झिम्बाबेच्या गोलंदाजांना झोडण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट पद्धतीची बॅट वापरली होती. ती बॅट म्हणजे मोंगुस बॅट (मुंगूस aka mongoose bat). मुंगूस बॅटचे हँडल सुमारे 43% लांब असते आणि क्रिकेटच्या खेळात वापरल्या जाणार्या पारंपारिक बॅटपेक्षा ह्या बॅटचे ब्लेड 30% लहान असते. त्यामुळे फलंदाजाला लॉंग शॉट मारण्यास मदत होते. ब्लेड लहान असल्यामुळे डिफेन्स करणे कठीण होते. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने २०१० आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना मुंगूस बॅटचा वापर केला होता. हेडनने खुलासा केला की चेन्नईचा कर्णधार महेंद्र धोनी मुंगूस बॅट वापरण्याच्या विरोधात होता कारण ब्लेड लहान असल्यामुळे स्ट्राईक बदलायला त्रास होईल असे धोनी ह्यांना वाटत असे. धोनी यांनी मॅथ्यू हेडनला असे प्रलोभन दिले होते कि हि मुंगूस बॅट वापरायचे बंद करायच्या बदली धोनी त्यांना (मॅथ्यू हेडनला) जगातील कुठलीही गोष्ट आणून देईल.
मुंगूस बॅट वापरास आय.सी.सी बंदी घातली आहे का?
सदर बॅट बद्दल असाही एक गैरसमज आहे कि, सदर बॅट वापरास बंदी घातली आहे, किंतु मुंगूस बॅट हि आय.सी.सी च्या नियमावलीत बसत असल्यामुळे अजून पर्यंत तरी अशी कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही.