Monday, December 23, 2024
Homeलाइफस्टाइलमाजी मुंबई पोलीस आयुक्त Rakesh Maria यांच्या आत्मचरित्रातील खुलासे: 1993 Mumbai Blasts...

माजी मुंबई पोलीस आयुक्त Rakesh Maria यांच्या आत्मचरित्रातील खुलासे: 1993 Mumbai Blasts आणि Sanjay Dutt | Let Me Say It Now

मा. मुंबई पोलीस आयुक्त Rakesh Maria यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये “लेट मी से इट नाऊ “ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्यात त्यांनी ते तपास अधिकारी असताना त्यांनी हाताळलेल्या अनेक प्रकरणाचा खुलासा केला आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदापासून मुंबई पोलीस आयुक्तपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून निवृत्त झालेले राकेश मारिया यांनी अनेक धक्कादायक उलगडे त्यांच्या आत्मचरित्रात केले आहेत. समस्त मुंबई आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा तपास करताना जेव्हा सिनेअभिनेता आणि खासदार दिवंगत सुनील दत्त यांचे पुत्र आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता संजय दत्त याचे नाव समोर आले तेव्हा कश्याप्रकारे संवेदनशीलपणे सदर प्रकारचा छडा लावला याचा संपूर्ण खुलासा ह्या पुस्तकात आहे.

जेव्हा सर्व प्रथम संजय दत्त याचे नाव समोर आले

जेव्हा हनीफ आणि समीर ह्या अटक केलेल्या आरोपींनी संजय दत्तचे नाव पहिल्यांदा उघडकीस आणले होते, तेव्हा राकेश मारिया यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.Journalist Who Broke News Of Sanjay Dutt’s Arrest In 1993 Thrashes Sanju Without Watching It – Filmibeatत्यांनी तात्काळ फोन करून जॉईंट कमिश्नर एम.एन.सिंग यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. संजय दत्त याची वडील प्रतिष्टीत खासदार असल्यामुळे सदर प्रकरण एकदम नाजूकपणे हाताळायचे ठरवले गेले.

त्यावेळेला संजय दत्त मॉरिशिअस येथे “आतिष” चित्रपटाची शूटिंग करत होता, सदर माहिती उघडकीस आल्यास संजय दत्त फरार होण्याचा धोका होता. त्यामुळे सदर प्रकरणाची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु तरीही वर्तमानपात्रात हि माहिती झळकली. संजय दत्तचे वडील दिवंगत सुनील दत्त यांनी आपल्या मुलाला पोलिसांना सामोरे जायला सांगितले. संजय दत्त जेव्हा मुंबई मध्ये आला तेव्हा त्याला विमानतळावर अटक करून क्रॉफर्ड मार्केट येथील सि.पी.च्या कार्यालयात गुन्हे शाखेत आणले.

संजय दत्तला ज्या खोलीत ठेवले होते त्या खोलीत जायची परवानगी अजून कुणालाही नव्हती. जर शौचालय वापरायचे असेल तर दार खुलले ठेवण्यास सांगण्यात आले होते, तसेच धूम्रपान करण्यासाठी देखील बंदी घालण्यात आली होती. संजय दत्तला रात्रभर तसेच ठेवण्यात आले होते जेणेकरून तो मानसिकदृष्ट्या संपूर्ण तुटून जाईल, तसेच त्याच्या कुटुंबालाही त्याला भेटण्याची बंदी घालण्यात आली होती.

मी तुला सज्जन माणसासारखे विचारतोय, तू सुद्धा तसेच उत्तर दे.

दुसऱ्या दिवशी राकेश मारिया यांनी चौकशी सुरु केली असता संजय दत्त यांनी आपला गुन्हा नाकारला. तेव्हा राकेश मारियांनी संजय दत्तच्या कानाखाली मारून, “मी तुला सज्जन माणसासारखे विचारतोय, तू सुद्धा तसेच उत्तर दे” अशी ताकीद दिली. त्यानंतर संजय दत्तने रडत रडत सर्व गुन्हा कबुल केला.

(साभार – लेट मी से इट नाऊ)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments