जगात सर्वात कठीण धातू कुठला तर त्याचे उत्तर तुम्ही “हिरा” असे द्याल. किंतु एका हिऱ्याची किंमत नक्की कशी ठरते. प्रत्येकी १ कॅरेट च्या २ हिऱ्याची किंमत सेम का नसते. ह्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ. हिरा हा एक जगातील सर्वात कठीण आणि दुर्मिळ (खडतर प्रक्रियेतून मिळणारा) धातू आहे. १८९६ पर्यंत फक्त भारतातच हिऱ्याच्या खाणी होत्या. ह्यावरून तुम्हाला त्याचे महत्व पटून येईल. १८९६ मध्ये पहिल्यांदा भारताच्या बाहेर म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये हिरा सापडला होता.
४ C’s ऑफ डायमंड
हिऱ्याची किंमत हि ४ C’s वरून ठरते. ह्या ४ C’s म्हणजे कट, क्लॅरीटी, कलर आणि कॅरेट
१. कट – कच्च्या हिऱ्यामधून पक्का हिरा बनवताना म्हणजे त्याला आकार देताना त्याच्या आकारावरून तसेच त्यामधून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशावरून हि श्रेणी ठरते.
२. क्लॅरीटी – हिऱ्यामध्ये असणाऱ्या कार्बन (इन्क्लुजन) वरून त्याची FL, IF, VVS1, VVS2, VS1, VS2, SI1, SI2, I1, I2 आणि I3 ह्या श्रेण्या ठरतात.
३. कलर – नैसर्गिक हिऱ्याला त्याला उपलब्ध असणाऱ्या रंगानुसार “D”पासून “Z” पर्यंत श्रेणी दिली जाते. सदर श्रेणीत “D” म्हणजे सर्वोत्कृष्ट असतो.
४. कॅरेट – हिऱ्याच्या वजन हे कॅरेट मध्ये गणले जाते, कॅरेट जेवढे जास्त हिरा तेवढा वजनदार.