जगातील सर्वात श्रेष्ठ असा शास्त्रज्ञ जर कुणी असेल तर तो आहे आपला निसर्ग. निसर्ग विश्वाच्या उत्पत्तीपासून निरनिराळे प्रयोग करीत आहे. तसेच विविध प्रजातीची उत्पत्ती देखील करीत आहे. जी उत्पत्ती पर्यावरणाशी जुळवून घेण्यास तगडी नसते अश्या प्रजातीचा विनाश पावतो. सोप्या शब्दात सांगायचे म्हटले तर उत्पत्तीचे जे प्रयोग निसर्गाकडून अयशस्वी झाले आहे अश्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
डायनोसॉर हि अशीच एक प्रजाती होती जिचा नियम निसर्गनियमानुसार झाला होता. तब्बल साडे सोळा कोटी वर्षांपूर्वी ह्या प्रजातीच्या पृथ्वीवर आपले वर्चस्व दर्शविले आहे. तत्कालीन सबळ असणाऱ्या ह्या प्रजातीचा विनाश मात्र निसर्गनियमानुसार न होता अनुचित अपघातातून झाला होता.
अवकाशातून एक लघुग्रह (अथवा भला मोठा धूमकेतू) पृथीवर जेथे आज मेक्सिको आहे तिथे येऊन आदळला होता. ह्या भयंकर अपघातात मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि अतिप्रचंड उष्णता निर्माण झाली. सदर घटनेमुळे कित्येक प्रजाती मृत पावल्या. किंतु ज्या काही प्रजाती तग धरून उभ्या होत्या त्यांच्यासाठी मृत्यू वेगळ्या प्रकारे वाट बघत होता. उद्रेकाने प्रचंड प्रमाणात धूळ आणि कचरा आकाशात फेकला गेला, वातावरणात मोठा बदल झाला. तीव्र स्वरूपात आम्लवर्षा झाली.
सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिडचे प्रमाण वाढले गेले, समुद्रात त्सुनामी आले. सदर घटनेने कित्येक सजीव मृत्य पावले. वातावरणात मोठ्या प्रमाणात धुळेंचे आवरण जमा झाल्यामुळे सूर्यप्रकाश असून पृथ्वीवरील वातावरण घसरू लागले. वनस्पतींचा देखील विनाश होऊन जीवन साखळी मोठ्या प्रमाणात तुटली गेली. पर्यावरणाच्या अचानक झालेल्या ह्या बदलाशी जुळवून घ्यायला आवश्यक वेळ सुद्धा मिळाला नाही. घ्या घटनेमुळे डायनोसॉर सारख्या प्रजातीचा देखील टिकाव लागला नाही आणि हि प्रजाती विनाश पावली ती कायमचीच. (Extinction of Dinosaurs)