Saturday, October 5, 2024
Advertisment
Google search engine
Homeऐतिहासिकविमानाचा शोध: राईट बंधू की शिवकर तळपदे? (Shivakar Talpade)

विमानाचा शोध: राईट बंधू की शिवकर तळपदे? (Shivakar Talpade)

विमानाचा शोध कुणी लावला? (Wright brothers or Shivkar Talpade?)

रामायण वाचलेले काही वाचक आपल्याला ह्याचे उत्तर रामायणात दडलेले आहे असे सांगतील आणि रावणाकडे पुष्पक नावाचे विमान होते आणि कदाचित त्याचाच वापर करून त्याने माता सीता ह्यांचे हरण केले असे सांगतील. अगदी रामायणात तशी नोंद देखील आहे. तर मग रामायण काळात मानवाला विमान निर्मितीची कला अवगत होती? खरोखर रामायण कालीन मानव तेव्हढा प्रगतीशील होता? इतिहासकारांनी देखील अनेक पुरावे दिले आहेत ज्या मधून हे सिद्ध होते कि रावणाचे पुष्पक विमान आणि रामायण ह्या दंत कथा नसून वास्तव आहे. खरे म्हटले तर ह्या विषयावर विस्तारपूर्व लिहायचे तर वेगळा लेख लिहावा लागेल म्हणून सध्या रावणाचे पुष्पक विमान साईडला ठेवून आपल्या मूळ विषयावर वापस येऊ.

शिवकर तळपदे

कदाचित तुमच्या पैकी बऱ्याच जणांना माहित असेल कि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कृष्णाजी विनायक वझे आणि परशुराम थत्ते ह्यांनी विमानशास्त्रावर बरेच संशोधन केले होते आणि ह्यांच्याच संशोधनाने प्रेरित होऊन तळपदे यांनी अश्या प्रकारचे यंत्र मुंबई मध्ये बनविण्याचे ठरविले होते. त्यांनी आपल्या घरातील प्रयोगशाळेत ६ मीटर बाय १.२ मीटर आकाराचा सांगाडा बनवून प्रयोगांना सुरुवात केली. विमानाला ऊर्जा मिळण्यासाठी त्यांनी त्यात पाऱ्याचा वापर केला.

सूर्यकिरण आणि पारा ह्यांच्या संयोगाने पाऱ्याचे विघटन होऊन हायड्रोजन वायू तयार होईल, आणि हायड्रोजन वायू हा हवेपेक्षा हलका असल्यामुळे आकाशात उडेल अशी त्यांची सोपी संकल्पना होती. त्यानुसार सारी जय्यत तयारी करून त्यांनी १८९५ च्या डिसेंबर महिन्यात मुंबई येथील गिरगाव चौपाटी येथे सर्व सरकारी परवानग्या घेऊन विमान उडविण्याचे ठरविले. सदर विमानाचे नाव त्यांनी “मरुत्सखा” असे ठेवले होते.

विमान उडविण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी त्याकाळच्या प्रतिष्टीत व्यक्ती उदा. जगन्नाथ शेट, गोपालकृष्ण गोखले सुद्धा आले होते. सदर विमानाने गती घेऊन काही मीटरची उंची गाठली आणि ते विमान जमिनीवर कोसळले. असे म्हटले जाते शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी ह्या नंतर आपले विमान डिसाईन राईट बंधूंना दिले किंतु सदर घटनेचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही, परंतु तळपदे ह्यांनी उडविलेल्या ह्या विमानाचा वृत्तांत त्यावेळच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता.

ते विमान काही उंची का होईना जमिनीपासून काही मीटर उंच अंतर गाठले म्हणून हा प्रयोग यशस्वी म्हणता येईल किंतु अधिक उंची न गाठून लक्षणीय अंतर पार न केल्यामुळे ह्या विमानाला जागतिक मान्यता मिळाली नाही. परंतु राईट बंधूसाठी प्रेरणादायी ठरणार हा प्रयत्न तळपदे यांनी खूप आधी केल्यामुळे निदान आम्हा भारतीयांसाठी तरी आधुनिक विमानाचे जनक शिवकर बापूजी तळपदेच राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments