झारखंडच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे (Champai Soren resigns as Jharkhand CM), झारखंडच्या मुख्यमंत्री पदी हेमंत सोरेन यांची नेमणूक होणार असून, हेमंत सोरेन सात जुलै रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
हेमंत सोरेन यांना प्रवर्तन संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी झारखंड झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या (JMM) बैठकीत हेमंत सोरेन यांची पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चंपई सोरेन यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर ते काही काळ निराश झाले होते, पण त्यांनी पक्षाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
हेमंत सोरेन यांनी सात जुलै रोजी मोरहाबादी मैदानात एक भव्य समारंभात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले आहे. हेमंत सोरेन यांनी आपल्या ट्वीटरवर राज्यपालांचे आभार मानत विरोधकांनी रचलेल्या लोकशाही विरोधी षड़यंत्राची टीका केली आहे.
महामहिम राज्यपाल महोदय का धन्यवाद।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) July 4, 2024
विरोधियों द्वारा रची गई लोकतंत्र विरोधी साज़िश के अंत की शुरुआत हो गई है।
सत्यमेव जयते। pic.twitter.com/TSe2PRqp1w
या नवीन नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील विकासकामांना गती देणे, बेरोजगारीची समस्या सोडवणे, आणि राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे आव्हान असेल. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील नवीन सरकारने राज्याच्या जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी आणि झारखंडला आणि पर्यायाने भारत देशास प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करावा हीच शुभेच्छा!