Saturday, October 5, 2024
Advertisment
Google search engine
Homeजागतिकब्रेन-ईटिंग अमीबाने (Brain Eating Amoeba) केरळमध्ये तरुणाचा मृत्यू: जाणून घ्या Naegleria fowleri...

ब्रेन-ईटिंग अमीबाने (Brain Eating Amoeba) केरळमध्ये तरुणाचा मृत्यू: जाणून घ्या Naegleria fowleri बद्दल

Naegleria fowleri, ज्याला ब्रेन ईटिंग अमीबा (Brain Eating Amoeba) असेही म्हणतात, हा एक दुर्मिळ पण धोकादायक सूक्ष्मजीव आहे जो मेंदूच्या गंभीर संसर्गाला कारणीभूत ठरू शकतो. केरळमध्ये बुधवारी रात्री एका १४ वर्षीय मुलाचा आमोबिक मेनिंगोएनसेफलायटिसच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत केरळमध्ये ब्रेन-ईटिंग अमीबामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळच्या कोझिकोड येथील हा तरुण, २४ जून रोजी गंभीर डोकेदुखी, मळमळ आणि उलट्याच्या लक्षणांसह रुग्णालयात दाखल झाला होता.

ब्रेन ईटिंग अमीबा म्हणजे काय?

Naegleria fowleri, ज्याला ब्रेन-ईटिंग अमीबा म्हणतात, हा एक दुर्मिळ परंतु धोकादायक सूक्ष्मजीव आहे जो प्राथमिक अमिबिक मेनिंगोएनसेफलायटिस (PAM) नावाच्या मेंदूच्या गंभीर संसर्गाला कारणीभूत ठरतो.

अमीबिक मेनिंगोएनसेफलायटिसची लक्षणे कोणती आहेत?

प्राथमिक अमिबिक मेनिंगोएनसेफलायटिसची लक्षणे संपर्कानंतर दोन ते पंधरा दिवसांपर्यंत दिसून येतात. ही लक्षणे त्वरीत प्रगती करतात. सुरुवातीच्या टप्प्यात, PAM चे (प्राथमिक अमिबिक मेनिंगोएनसेफलायटिस) निदान करणे कठीण असते. Naegleria Fowleri संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अत्यंत वेदनादायक डोकेदुखी, उच्च ताप, मान दुखणे, मळमळ आणि उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात.

नंतरच्या टप्प्यात रुग्ण बेचैन होऊ शकतो तसेच त्याला फिट्स येऊन संतुलन गमावू शकतो आणि कोमामध्ये जाऊ शकतो त्यामुळे ह्याचा संसर्ग हा रुग्णांसाठी घातक ठरण्याची शक्यता असते.

Naegleria Fowleri कुठे आढळते?

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार, हा अमीबा उबदार ताज्या पाण्याच्या सरोवर, नद्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळतो. क्वचित प्रसंगी, तो निगा न राखलेल्या जलतरण तलावांमध्येही आढळू शकतो.

हा संसर्ग कसा होतो आणि पसरतो?

Naegleria Fowleri शरीरात नाकाद्वारे प्रवेश करते. कारण ब्रेन ईटिंग अमीबा नाकाच्या पोकळीजवळ असलेल्या घ्राणेंद्रियाच्या नसाद्वारे मेंदूपर्यंत सहज पोहोचू शकतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे Naegleria Fowleri अमीबा असलेल्या पाण्याचे सेवन केल्याने संसर्ग होत नाही. प्राथमिक अमिबिक मेनिंगोएनसेफलायटिस हा संसर्ग संक्रामक नाही आणि कोरोनासारखा व्यक्तीपासून व्यक्तीला पसरत नाही. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, या संसर्गाचे प्रसारण व्यक्तीपासून व्यक्तीमध्ये झाल्याचे कोणतेही प्रकरण नाही.

यावर उपचार शक्य आहे का?

PAM (प्राथमिक अमिबिक मेनिंगोएनसेफलायटिस) खूप वेगाने रुग्णावर आघात करतो आणि त्याचे निदान करणे कठीण असते. ९७% प्रकरणांमध्ये तो धोकादायक ठरतो. तथापि, उत्तर अमेरिकेतील काही बचावलेल्या रुग्णांवर अँफोटेरिसिन बी, रिफॅम्पिन, फ्लुकोनाझोल आणि मिल्टेफोसिन नावाच्या औषधांच्या संयोजनाने उपचार करण्यात आले होते, असे CDC ने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments