Monday, December 23, 2024
Homeलेटेस्ट बातम्यामुंबईत पाऊस: शहरात ३०० मिमी पावसाची नोंद (Heavy Rainfall in Mumbai)

मुंबईत पाऊस: शहरात ३०० मिमी पावसाची नोंद (Heavy Rainfall in Mumbai)

मुंबईत मुसळधार पाऊस: शहरात ३०० मिमी पावसाची नोंद

सोमवारी पहाटे मुंबईत मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे विविध भागात पाणी साचले. या पावसामुळे शहरातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने सांगितले की, पाणी साचल्यामुळे अनेक बस रूट बदलावे लागले. (Heavy Rainfall in Mumbai)

शाळांना सुट्टी

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सांगितले की सोमवारी पहाटे १ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी ३०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. BMC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पाणी साचले असून परिणामी उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.” विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून BMC ने मुंबईतील सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांसाठी पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर पुढील सत्राबाबत निर्णय घेतला जाईल.

हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की सोमवारी (८ जुलै) मुंबईत संपूर्ण दिवसभरात मध्यम ते जोरदार पाऊस होईल, रात्री वादळाची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात सतत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ८ जुलै ते १० जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पावसामुळे रेल्वे सेवा प्रभावित

सोमवारी सकाळी महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे, स्टेशन आणि ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी (CRPO) यांनी निवेदनात म्हटले आहे, “सायन आणि भांडुप ते नाहूर स्टेशनदरम्यान रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गाड्या जवळपास एक तास उशिराने चालत आहे. आता पाणी थोडे ओसरले आहे, त्यामुळे गाड्या पुन्हा सुरू होत आहेत, परंतु सेवा अद्यापही प्रभावित आहे.”

नंतर, पश्चिम रेल्वेने सोशल मिडिया वेबसाईट ट्वीटर (x.com) जाहीर केले की त्यांनी ट्रॅकवरून पाणी काढण्यासाठी उच्च क्षमतेचे पंप वापरले आहेत आणि उपनगरीय विभाग आता सामान्यपणे कार्यरत आहे. तसेच रेल्वे कर्मचारी सदर परीष्टीतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे जेणेकरून प्रवाशांची कुठल्याची प्रकारची गैरसोय होणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments