प्राचीन काळातील पृथ्वीवर दोन चंद्र असण्याची शक्यता
पृथ्वीचा एकमेव चंद्र आपल्यासाठी परिचित आहे, परंतु खगोलशास्त्रज्ञांनी मांडलेला एक सिद्धांत असा सूचित करतो की, प्राचीन काळात पृथ्वीला दोन चंद्र होते (Ancient Earth with Two Moons). हा सिद्धांत २०११ साली काही खगोलशास्त्रज्ञांनी मांडला आहे.
पुरातन काळातील दोन चंद्रांची कहाणी
साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा मंगळाच्या आकाराचा एक उल्का पृथ्वीवर आदळला, तेव्हा पृथ्वीचा एक तुकडा उडून अंतराळात फेकला गेला. हेच वस्तुमान एकत्र येऊन गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने चंद्रात रूपांतर झाले. त्याच वेळी, त्याच वस्तुमानातून एक छोटा चंद्रही जन्माला आला, ज्याला ‘मूनलेट’ असे म्हणतात.
दुसऱ्या चंद्राचा अदृश्य होण्याची संभाव्य कारणे
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, दोन चंद्रांची स्थिती अस्थिर होती आणि त्यामुळे त्यांची टक्कर होणे स्वाभाविक होते. परंतु, चंद्रकक्षेच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे हा दुसरा छोटा चंद्र काही कोटी वर्षांपर्यंत स्वतंत्र अस्तित्व टिकवून होता. नंतर मात्र तो मुख्य चंद्राकडे आकर्षित होऊ लागला.
दुसऱ्या चंद्राचे विलीनीकरण
दुसरा चंद्र लहान असल्यामुळे लवकरच घनीभूत झाला. मुख्य चंद्राच्या पृष्ठभागावर अजूनही लाव्हारस वाहत होता. त्यामुळे तो द्रवरूप होता. या लहान चंद्राने कित्येक कोटी कालावधी पर्यंत आपले अस्तिस्त्व टिकवून ठेवले होते किंतु लहान चंद्र हा मोठ्या चंद्राच्या जवळ येत होता. कालांतराने लहान चंद्राचे मोठ्या चंद्राच्या जवळ येऊन दोघांची हळुवार टक्कर झाली. जेव्हा ते एकमेकांना भिडले, तेव्हा ती टक्कर संथ गतीत असल्यामुळे, लहान चंद्र मोठ्या चंद्राच्या द्रवरूप मॅग्मात कोणताही खड्डा न करता मिसळून गेला.
द्राच्या गोलार्धांमधील फरक
या सिद्धांताचा पुरावा म्हणून खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या दोन गोलार्धांमधील फरक दर्शवला आहे. चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसतो, तो काळसर आणि सपाट आहे. तर जो भाग आपल्याला दिसत नाही, तो अनेक पर्वतराजींनी भरलेला आणि अतिशय उंचसखल आहे. हा फुगवटा दुसऱ्या लहान चंद्राच्या विलीन होण्यामुळेच असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले आहे.