‘ट्विन्कल ट्विन्कल लिटिल स्टार’ यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात हे समजवण्यात आले आहे. परंतु, तारे लुकलुकतात, याचे शास्त्रीय कारण काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (Why do stars twinkle?)
सूची
ताऱ्यांची प्रकाश निर्मिती
तारे स्वयंप्रकाशित असतात. त्यांच्या अंतरंगात अस्तित्वात असलेल्या अणुभट्ट्यांमधून प्रचंड ऊर्जा निर्मिती होते आणि ती ऊर्जा प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. हा प्रकाश अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जातो. परंतु, आपल्यापर्यंत पोहोचताना त्यांना पृथ्वीच्या वातावरणातून पार करावं लागतं.
वातावरणातील प्रभाव
पृथ्वीच्या वातावरणात वायू आणि धूळ असते. हे घटक स्थिर नसतात, ते सतत हलत असतात. आकाशात ढगांची हालचाल आपण पाहतो. ढग सतत हलत असतात आणि त्यांच्या आकारातही बदल होत असतो. त्याचप्रमाणे, हवा देखील सतत हलत असते. जेव्हा ताऱ्यांचे प्रकाशकिरण या हलत्या वातावरणातून जातात, तेव्हा ते किरण स्थिर नसतात आणि सतत हलत असल्यासारखे वाटतात. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखे दिसतात. वास्तविकता, हलणारी हवा हे मुख्य कारण आहे.
ग्रह का लुकलुकत नाहीत?
तारे लुकलुकतात, पण ग्रह का लुकलुकत नाहीत? याचे कारण म्हणजे ग्रहांचा आणि ताऱ्यांचा प्रकाश निराळा असतो. ताऱ्यांचा प्रकाश दूरवरून येत असतो आणि तो आपल्याला एकमेव किरणासारखा वाटतो. त्यामुळे हलत्या हवेतून तो अधिक लुकलुकतो. पण ग्रहांचा प्रकाश परावर्तित असतो आणि तो झोतस्वरूप असतो. त्यामुळे त्यांच्यावर हवा कमी परिणाम करते आणि ते स्थिर दिसतात.
सूर्यही एक तारा आहे, परंतु तो आपल्या अगदी जवळ असल्यामुळे त्याचा प्रकाश स्थिर दिसतो. सूर्याचा प्रकाश झोतस्वरूप असतो आणि तो विशाल पसरतो, त्यामुळे सूर्य देखील लुकलुकताना भासत नाही.
तारे लुकलुकण्याचे महत्वाचे कारण
तारे आपल्या पासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष दूर असतात. त्यांच्या अंतरावरून त्यांचा बिंब एखाद्या बिंदूसारखा दिसतो. त्यामुळे, हलत्या हवेतून येताना ताऱ्यांचा प्रकाश अधिक लुकलुकतो. हा प्रकाश किरण एकमेव किरणासारखा दिसतो, जो हलत्या हवेतून पार होतो आणि तारे लुकलुकत असल्याचा भास निर्माण होतो.