Table of Contents
परिचय (Importance of Dwarka)
गरुडपुराणानुसार भारत नगरात स्थित असणाऱ्या अयोध्या, मथुरा, काशी, अवंती, माया, पुरी आणि द्वारका या सात नागरींना विशेष महत्व असून हिंदू धर्मात ह्या सात नगरी पवित्र मानल्या जातात आणि त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. ह्या सात तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी समज आहे, हिंदू धर्मातील ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचे म्हटले तर द्वारका सोडून इतर सर्व तीर्थक्षेत्रांना सहज भेट देता येते. महाभारत काळातील श्रीकृष्णाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी द्वारकानगरी वास्तवात कुठे आहे, याबद्दल आजही उत्सुकता कायम आहे.
द्वारका (Dwarka) – पौराणिक कथा आणि महत्त्व
द्वारका (Dwarka) नगरी हि पौराणिक नगरी असून ह्या नगरीचा उल्लेख महाभारतात तसेच भगवदगीतेत देखील नमूद आहे. श्रीकृष्णाने मथुरेकडून होणाऱ्या आक्रमणाचा बचाव करण्यासाठी द्वारका नगरीची निर्मिती केली असा पौराणिक उल्लेख सापडतो. तसेच हि नगरी यादवांची राजधानी होती असे देखील पुराणात नमूद केलेले आहे. द्वारकानगरीच्या माध्यमातून यादवांनी एक प्रबळ राज्य स्थापन केले होते. याच कारणाने द्वारकाला पवित्र नगरी म्हणून ओळखले जाते.
पौराणिक द्वारका आणि आधुनिक द्वारका
आजच्या घडीला गुजरात स्थित जामनगर जिल्ह्यात द्वारका नावाचे गाव आहे आणि त्याला तीर्थक्षेत्र म्हणून एक विशेष महत्व देखील प्राप्त झाले आहे. लाखो श्रद्धाळू ह्या द्वारका नगरीला भेट देतात. किंतु महाभारतात वर्णन केलेली द्वारका नगरी हीच आहे का? पौराणिक वर्णनावरून असे कळते कि द्वारका नगरी हि खूप मोठी होती त्यामुळे पुराणात उल्लेखलेली द्वारका नगरी हीच आहे का यावर शंका उभी राहते. पौराणिक उल्लेखानुसार महाभारत युद्धानंतर कौरवांचा झालेल्या संहाराला कुंतीने भगवान श्रीकृष्णाला दोषी ठरवून त्यांना शाप दिला की, जसा माझ्या पुत्रांचा संहार झाला त्याचप्रमाणे यादव वंशाचाही एके दिवशी नाश होईल आणि त्याची द्वारकानगरी समुद्रात बुडेल. या शापामुळे पुढे द्वारका नगरीचा नाश झाल्याचे मानले जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर पौराणिक द्वारका नगरी हि पाण्यात बुडून गेली म्हणजेच आजची आधुनिक द्वारका आणि पौराणिक द्वारका वेगवेगळी असू शकते असे काही लोकांचे अनुमान आहे.
द्वारकेचा पुरातत्वीय शोध
भारतीय पुरातत्व खाते (ASI) यांनी जवळपास १९८३ मध्ये सागरी पुरातत्व संशोधकाच्या साहाय्याने समुद्रात स्थित असणाऱ्या पौराणिक द्वारका नगरीचा शोध सुरु केला. या मोहिमेत पाणबुडीच्या साहाय्याने गुजरात येथील खंबातच्या आखातात समुद्राच्या पोटात उत्खनन करण्यात आले. ह्या संशोधनासाठी आधुनिक अश्या सोनार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पुरातत्त्व संशोधकांनी सोनार उपकरणांच्या सहाय्याने पाण्याखालील जमिनीचे निरीक्षण केले आणि त्यात प्राचीन नगरीच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले.
एस.आर. राव यांचे नेतृत्वाखालील संशोधन
गोव्यात स्थित असणारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधक एस.आर. राव यांनी द्वारकेच्या शोधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आम्ही जसे आधी सांगितले तसे आधुनिक सोनार तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनासाठी करण्यात आला. पाणबुडीच्या साहाय्याने समुद्रात खोलवर जाऊन अभ्यास करण्यात आला. त्यांच्या पथकाने विविध ठिकाणी उत्खनन केले आणि पाण्याखाली असणाऱ्या द्वारकानगरीचे संकेत मिळविले.
समुद्रात सापडलेले अवशेष (Dwarka Underwater)
एस.आर. राव यांच्या पथकाने केलेल्या शोधकार्यात समुद्राच्या तळाशी निरनिराळे अवशेष मिळाले. ह्या अवशेषांमध्ये प्राचीन मातीची भांडी, दगड आणि धातूची साधने ह्यांचा समावेश होता. संशोधकांनी कार्बन डेटिंगच्या मदतीने ह्याचे वय तपासले असता ती जवळपास ३५०० वर्ष जुनी आहे असा अंदाज बांधण्यात आला. सोप्या शब्दात बोलायचे म्हटले हे अवशेष हे जवळपास महाभारताच्याच कालखंडाशी संबंधित होते आणि त्यामुळे महाभारतकालीन द्वारकेचे अस्तित्व सिद्ध होत असल्याचे मानले जाते.
द्वारका (Dwarka) आणि महाभारत
हिंदू धर्मात महत्वपूर्ण अश्या महाभारत या प्राचीन ग्रंथात देखील द्वारकेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. हिंदू मान्यतेनुसार या नगरीला यादवांचे राज्य मानले गेले आहे आणि यादवांची राजधानी देखील इथेच स्थित होती. महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर द्वारका ही यादवांची मुख्य राजधानी होती. महाभारतातील द्रौपदीचे स्वयंवर आणि महायुद्धात यादवांचा सहभाग या घटनांमध्ये द्वारकेचे महत्त्व दिसून येते. महाभारतामधील अनेक ऐतिहासिक संदर्भ द्वारकेच्या पावित्र्याला अधोरेखित करतात.
पुराणे आणि इतिहास यातील संबंध
गुजरात येथील खंबात येथे भेटलेले द्वारका नगरीची अवशेष हे हिंदू पूर्ण आणि भारतीय इतिहासात एक महत्वाचा दुवा निर्माण करतात. जर द्वारकानगरीचे अस्तित्व समुद्राच्या आत मिळाले आहे याचा अर्थ असा होतो कि पुराणात वर्णन केलेली द्वारका नगरी निव्वळ कथा नसून ती वास्तववादी आहे हे सिद्ध होते. ह्या शोधामुळे भारतीय पुराण हि केवळ दंतकथा नसून त्याला इतिहासाची साक्ष आहे हे सिद्ध होते.
द्वारकेचा सागरी पुरातत्त्वीय शोध
द्वारकेचा शोध फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही तर तो पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. समुद्राच्या पोटात द्वारकेचा शोध लावून पुरातत्त्व संशोधकांनी इतिहासाच्या अनोख्या पैलूला उजाळा दिला आहे. समुद्राच्या आत असलेल्या द्वारकेच्या भिंती, रस्ते, अवशेष आणि विविध वास्तू यांचा शोध हा एक ऐतिहासिक शोध म्हणून मानला जातो.
द्वारका: पवित्र नगरीचे धार्मिक महत्त्व
गरुडपुराणात खालील ओळ रचली आहे.
अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैताः मोक्षदायिकाः ॥
हिंदू धर्मात ७ तीर्थक्षेत्रास विशेष महत्व आहे, ह्या ७ तीर्थक्षेत्रांस भेट दिल्यावर मोक्ष प्राप्ती होते असा समज आहे. ह्याच सप्त पुरी मधील एक द्वारका नगरी असल्यामुळे तसेच भगवान श्रीकृष्णाचा निवास असलेल्या द्वारकेला तीर्थक्षेत्राचे महत्त्व मिळाले आहे. दरवर्षी लाखो भाविक द्वारकेला भेट देतात आणि धार्मिक विधींचा अनुभव घेतात. यामुळे द्वारका हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र बनले आहे.
द्वारकेचे सांस्कृतिक महत्त्व
द्वारका नगरी केवळ धार्मिक ठिकाण नसून भारतीय पौराणिक संस्कृतीचे प्रतीक आहे. द्वारकेचा शोध भारतीय पुराणे आणि इतिहासामधील ऐतिहासिक घटना यांमध्ये संबंध सिद्ध करतो. द्वारकेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू जगासमोर येतो.
विज्ञान आणि पुराणे यांचा संगम
द्वारकेचा शोध विज्ञान आणि पुराणे यांचा संगम म्हणून मानला जाऊ शकतो. संशोधकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून द्वारकेचा शोध घेतला आहे ज्यामुळे हिंदू संस्कृती हे केवळ रचित काव्य नाही हे सिद्ध होते. सोनार तंत्रज्ञानाच्या मदतीने समुद्राच्या आत लपलेल्या नगरीच्या अवशेषांचा शोध घेतल्याने विज्ञानानेही द्वारकेच्या अस्तित्वाला आधार दिला आहे.
द्वारकानगरीचे भविष्य
द्वारकेच्या संदर्भात आणखी संशोधन आणि उत्खनन केल्यास या नगरीच्या अस्तित्वाबद्दल अधिक माहिती मिळू शकते. भविष्यातील आधुनिक संशोधनातून द्वारकेच्या अधिक इतिहासाचा शोध घेतला जाऊ शकतो. तसेच तंत्रज्ञानाने प्रगती केल्यास समुद्र स्थित नगरीस देखील भेट देणे सर्व सामान्य नागरिकांना शक्य होईल हीच अपेक्षा आहे.