Monday, December 23, 2024
Homeकुतूहलमेहंदीनं हात कसे रंगतात? (How Mehndi colors hands)

मेहंदीनं हात कसे रंगतात? (How Mehndi colors hands)

मुलीचे हात पिवळे केले की सुटलो, असं पूर्वीचे वधूपिते म्हणत असत. कारण पारंपरिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही, हळद लावून स्नान घालण्याची प्रथा आहे. अजूनही ती प्रथा चालू आहे; पण आजकालच्या लग्नात नवऱ्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हात-पाय मेहंदीनं रंगविण्याची प्रथा वाढीला येऊ लागली आहे. (How Mehndi colors hands)

मेहंदीचा वापर आणि परंपरा

बारीक बारीक नक्षीदार मेहंदीनं हात, पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेहंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी?

लॉसोनिया इनर्मिस: मेहंदीचं झुडप

लॉसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत यालाच हेन्ना म्हणतात आणि भारतीय उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पानासारखी हिरवीच असली तरी त्यांच्यामध्ये लॉसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नॅप्थालिनच्या जातकुळीतल्या या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोजसारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो.

विविध प्रकारच्या मेहंदीचे रंग

मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्यानं त्या रंगाच्या छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यतः हा रंग लाल-नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्यासारखा, दालचिनीसारखा तपकिरी, काळसर, चॉकलेटी, चेरीसारखा गडद लाल अशा वेगवेगळ्या रंगांची मेहंदी मिळते.

मेहंदीचा रंग कसा लागतो?

आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फॉस्फोलिपिड रसायनाच्या किंवा त्या पेशीतल्या प्रथिनांच्या रेणूंपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात आणि प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या केरॅटिन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये केरॅटिनचं प्रमाण जास्त असलं तर लॉसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पलटतो.

मेहंदी लावण्याची पद्धत

पानांमधला रंग उतरून कातडीमध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटणात लिंबाचा रस मिसळला जातो. त्यातलं सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्या लॉसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments