Monday, December 23, 2024
Homeलेटेस्ट बातम्याझाडांचं वय कसं मोजतात? (How to measure the age of trees?)

झाडांचं वय कसं मोजतात? (How to measure the age of trees?)

पारंपरिक तंत्र: डेन्ड्रोक्रोनॉलॉजी

उभ्या आणि जिवंत झाडांचं वय मोजणं तसं कठीण आहे, कारण पारंपरिक पद्धती फक्त तोडलेल्या झाडांवरच वापरता येतात. डेन्ड्रोक्रोनॉलॉजी या तंत्राचा वापर करून झाडांच्या वयाचा अंदाज लावला जातो. यासाठी झाडाच्या खोडाचा आडवा छेद घेतला जातो, ज्यात एकमेकांच्या भोवती पसरलेली रिंगणं दिसतात. समशीतोष्ण कटिबंधातील झाडं दरवर्षी बुंध्यामध्ये एक नवीन रिंगण तयार करतात. बाहेरचं रिंगण सर्वात ताजं असतं, तर आतलं रिंगण सर्वात जुनं असतं. दरवर्षी एका रिंगणाची भर पडत असल्यामुळे रिंगणांची संख्या आणि झाडाचं वय यांचा थेट संबंध आहे. (How to measure the age of trees?)

रिंगणांची जाडी आणि ऋतूमान

रिंगणांच्या जाडीवरून त्या वर्षातील ऋतूमानाचा अंदाज काढता येतो. पाऊस भरपूर पडल्यास आणि पाणी मुबलक असल्यास, झाडाची वाढ चांगली होते आणि रिंगण रुंद असतं. याउलट, पाउस कमी पडल्यास असल्यास, झाडाची वाढ कमी होते आणि रिंगण अरुंद राहतं.

आधुनिक तंत्र: रेडिओकार्बन डेटिंग

उष्ण कटिबंधातील झाडांसाठी पारंपरिक पद्धती प्रभावी नसतात. अशा परिस्थितीत रेडिओकार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत झाडाच्या कार्बन डाय ऑक्साईड शोषणाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. कार्बनचे स्थिर १२ अणुभाराचे आणि किरणोत्सर्गी १४ अणुभाराचे घटक त्यांच्या गुणोत्तरावरून झाडाच्या वयाचा अचूक अंदाज बांधता येतो. यासाठी झाडाच्या अंतरंगातून एक छोटासा नमुना घेण्याची पद्धत विकसित केली आहे ज्याला रेडिओकार्बन डेटिंग म्हणतात.

जिवंत झाडांचं वय मोजणं

जिवंत झाडांचं वय मोजण्यासाठी झाडाचं नुकसान न करता बोअररच्या साहाय्यानं खोडाच्या मध्यातून एक नमुना घेतला जातो. घेतलेल्या नमुन्यातल्या रिंगणांची परीक्षा करून झाडाचं वय ठरवता येतं.

या सर्व पद्धतींच्या मदतीनं झाडांच्या वयाचा अचूक अंदाज बांधता येतो, आणि झाडांची वाढ आणि पर्यावरणीय परिस्थितींचा अभ्यास करण्यास मदत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments