Saturday, October 5, 2024
Advertisment
Google search engine
Homeलेटेस्ट बातम्यासन्माननीय दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर: अंकांचा जादुगार (Dattatreya Ramchandra Kaprekar - The Mathemagician)

सन्माननीय दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर: अंकांचा जादुगार (Dattatreya Ramchandra Kaprekar – The Mathemagician)

दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर (Dattatreya Ramchandra Kaprekar) यांना अंकांचा जादुगार म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काप्रेकर यांचा जन्म दिनांक १७ जानेवारी १९०५ रोजी महाराष्ट्रातील डहाणू येथे झाला. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.ते देवळाली येथील शाळेत शिक्षक होते. विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता त्यांनी आकड्यांच्या अनेक करामती शोधून काढल्या. हळूहळू त्यांच्या काही संशोधनांना मान्यता मिळाली.

संशोधन आणि प्रसिद्धी

काप्रेकरांचे काही संशोधन प्रख्यात अमेरिकन गणितज्ञ मार्टिन गार्डनर यांच्या ख्यातनाम मासिक “सायंटिफिक अमेरिकन” मध्ये देखील प्रकाशित झाले. ह्या मासिकात प्रकाशित केल्यामुळे काप्रेकरांच्या संशोधनास जगप्रसिद्धी मिळाली आणि ते फेमस झाले. ह्या मासिकामुळे भेटलेल्या प्रसिद्धी नंतर त्यांना “अंकाचा जादुगार” हे नाव बहाल झाले.

काप्रेकर स्थिरांक

काप्रेकरांनी आयुष्यभराच्या अथक संशोधनातून अंकांच्या अनेक गुणधर्मांचा छडा लावला. त्यांनी लावलेल्या अंकांच्या गंमतीमधील काही गंमती खालीलप्रमाणे:

६१७४- काप्रेकर स्थिरांक: कोणतीही चार अंकी संख्या ज्यात सर्व अंक एकदाच आले आहेत अश्या अंकांना चढत्या क्रमात रचून जी संख्या येईल त्याला आपण “संख्या अ” असे नाव देऊ. आता परत मूळ संख्या उतरत्या क्रमात रचून आलेल्या संख्येस “संख्या ब” असे नाव देऊ. आता “संख्या अ” मधून “संख्या ब” वजा करून आलेल्या उत्तरास परत तीच क्रिया केली तर ६१७४ ही संख्या भेटेल, आणि ह्या संख्येस काप्रेकर सिद्धांत म्हणतात.

उदाहरणार्थ, जर १५४७ हि संख्या घेतली तर “संख्या अ” चढत्या क्रमाने ७५४१ होतील आणि “संख्या ब” उतरत्या क्रमाने १४५७ होतील ज्याची वजाबाकी हि ६०८४ येईल. ६०८४ ह्या संख्येवर देखील तीच प्रक्रिया केली असता ८१७२, ७४४३, ३९९६, ६२६४, ४१७६ आणि शेवटी ६१७४ हे उत्तर भेटेल. त्यानंतर सुद्धा तीच प्रक्रिया चालू ठेवलीत तरी तीच संख्या मिळत राहील.

४९५- काप्रेकर स्थिरांक: एक तिन्ही अंक सारखे नसलेली तीन आकडी संख्या घ्या. तिचे आकडे वाढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहा. येणाऱ्या संख्यांची वजाबाकी करा. असे सतत करत रहा. शेवटी ४९५ ही संख्या येईल. उदाहरणार्थ, ४२९ -> ९४२ – २४९ = ६९३; ६९३ -> ९६३ – ३६९ = ५९४ -> ९५४ – ४५९ = ४९५.

अन्य गणितीय शोध

काप्रेकर यांनी स्वयंभू संख्या, कापरेकर संख्या, दत्तात्रेय संख्या, डेम्लो संख्या आणि हर्षद संख्या याचाही शोध लावला. त्यांनी असे अनेक शोध लावले, पण खेदाची बाब अशी की संपूर्ण जगाने गौरव केलेले अंकाचे जादुगार मात्र स्वतःच्या देशात दुर्लक्षित राहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments