माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) ची भौगोलिक रचना
हे शिखर (Mount Everest) हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ह्या शिखराची उंची हि ८८४८ मीटर आहे. हे शिखर नेपाळ आणि चीन (तिबेट) ह्यांच्या सीमेलगत पसरले आहे. जरी हे शिखर नेपाळ आणि चीन दोन्ही बाजूने चढता येऊ शकत असले तरी, देखील एव्हरेस्टचा नेपाळमार्ग हा चढण्यास सोपा समजला जातो. त्यामुळे कित्येक गिर्ह्यारोहक शिखर गाठण्यासाठी ह्याच मार्गाचा उपयोग करतात.
सदर शिखराचे (Mount Everest) चे जुने नाव
नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला (Mount Everest) सागरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. हे सर्वेक्षण होण्याच्या आधी “कांचनगंगा” शिखरास जगातील सर्वात उंच शिखर मानले जायचे. किंतु ह्या सर्वेक्षणानंतर अधिकृतरित्या माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर बनले.
पीक फिफ्टीन
हे सर्वेक्षण होण्याअगोदर माउंट एव्हरेस्टला (Mount Everest) “पीक फिफ्टीन” असे नाव होते, जे नंतर कर्नल जॉर्ज एव्हरेस्ट ह्यांच्या नावावरून माउंट एव्हरेस्ट असे ठेवण्यात आले. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड असल्यामुळे गिर्यारोहकांची वर्दळ ह्या शिखरावर अधिक असते.
माउंट एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करण्याचा मान.
शिखरावरील पहिले ८००० मीटर सर करण्याचा मान जॉर्ज फिंच ह्यांना जातो, त्यांनी १९२२ साली शिखरावरील ८००० मीटर पर्यंतची उंची गाठली होती. परंतु खराब वातावरणामुळे त्यांनी पुढील चढाई केली नव्हती.
त्यानंतर जवळपास ३४ वर्षानंतर ब्रिटिश मोहिमेअंतर्गत गिर्ह्यारोहकांच्या २ तुकड्या करण्यात आल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले. शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले, परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती आणि त्यामुळे त्यांनी मिशन अबोर्ट करायचे ठरविले.
आणि इतिहास घडला.
त्यानंतरची जोडी होती तेनसिंग नोर्गे आणि एडवर्ड हेनरी यांची. अगोदरच्या जोडीने खोदलेले मार्ग, लावलेल्या दोऱ्या आणि ठेवलेल्या ऑक्सिजन ह्यामुळे ह्यांची कमी दमछाक झाली. दिनांक २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता ह्या जोडीने इतिहास घडवून शिखरावर पहिले पाऊल ठेवले.
एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना “सर” या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना “जॉर्ज” या मेडलने सन्मानित करण्यात आले.
आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.
(माउंट एव्हरेस्ट बद्दल अजून माहिती पुढील भागात)