Monday, December 23, 2024
Homeटेक्नॉलॉजीरॉयल एनफील्ड गुरिल्ला 450: लॉन्च, पावर आणि किंमत (Royal Enfield Guerrilla 450)

रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450: लॉन्च, पावर आणि किंमत (Royal Enfield Guerrilla 450)

रॉयल एनफील्डने त्यांच्या नवीन गुरिल्ला 450 मोटरसायकलचे (Royal Enfield Guerrilla 450) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. ही बाइक हिमालयन 450 प्रमाणेच अनेक फीचर्ससह येते आणि तिची किंमत दोन लाख रुपये पेक्षा जास्त आहे. कंपनीने या बाइकला तीन वेरिएंट्समध्ये सादर केले आहे – एनालॉग, डॅश आणि फ्लॅश.

Royal Enfield Guerrilla 450 (Image Credit – Royal Enfield Official Website)

गुरिल्ला 450 ची बुकिंग्स सुरू

गुरिल्ला 450 साठी हिमालयन एक डोनर मॉडेल आहे, ज्यामुळे या दोन्ही गाड्यांच्या फीचर्समध्ये बरीच समानता आहे. गुरिल्ला 450 ची बुकिंग्स देशभरात सुरू करण्यात आल्या आहेत आणि १ ऑगस्टपासून या बाइकच्या टेस्ट राईड्स सुरू होणार आहेत. हिमालयन 450 ए़डवेंचर टूरसाठी ओळखली जाते, तसेच गुरिल्ला 450 रोडस्टर म्हणून शहरी रस्त्यासाठी ओळखली जाईल.

गुरिल्ला 450 चे डिझाइन

रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 मध्ये सर्कुलर एलईडी हेडलँप आहे, जे कंपनीच्या नवीन बाइक्समध्ये पाहायला मिळते. या मोटरसायकलमध्ये टेल लँप आणि एक्झॉस्ट युनिट हिमालयन 450 पासून घेतले आहे. या दोन्ही बाइक्सच्या सीटमध्ये फरक ठेवला आहे. गुरिल्ला 450 मध्ये सिंगल पीस युनिट सीट आहे तर हिमालयन 450 मध्ये स्प्लिट सीट आहे.

रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 ची पावर

गुरिल्ला 450 मध्ये शेरपा 450 इंजिन आहे, जे हिमालयन 450 मध्ये देखील उत्तम परफॉर्मन्स देत आहे. हे 452 cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. या इंजिनमुळे बाइकला 8,000 rpm वर 39.52 bhp ची पावर मिळते आणि 5,500 rpm वर 40 Nm चा टॉर्क जेनरेट होतो. या बाइक मध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गियर बॉक्स आहे.

रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 चे फीचर्स

रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 मध्ये हिमालयन 450 प्रमाणेच एक छोटा फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे, जो गूगल मॅप्स (Google Maps) शी जोडला गेला आहे. या बाइकच्या लोअर वेरिएंटमध्ये डिजिटल डिस्प्ले सह एक एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे, जो रॉयल एनफील्डच्या शॉटगन 650 (Shotgun 650), सुपर मीटीयोर 650 (Super Meteor 650) आणि इतर मोटरसायकलमध्ये दिला गेला आहे.

गुरिल्ला 450 ची किंमत

रॉयल एनफील्डच्या गुरिल्ला 450 मध्ये 1,440 mm चा व्हील बेस आणि 169 mm चा ग्राउंड क्लीयरन्स आहे. या बाइकची सीटची उंची 780 mm आहे आणि या गाडीचे वजन टँक पूर्ण भरल्यावर 185 किलोग्रॅम आहे. या बाइकमध्ये 11 लीटरची फ्यूल टँक कॅपेसिटी आहे. रॉयल एनफील्डच्या या शानदार बाइकची किंमत 2.39 लाख रुपये पासून सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments