Saturday, October 5, 2024
Advertisment
Google search engine
HomeकुतूहलWhy flames always rise : ज्योत का वरच्या दिशेने उफाळते?

Why flames always rise : ज्योत का वरच्या दिशेने उफाळते?

वामन पंडितांचे विचार आणि त्यातील विज्ञान

‘केला जरी पोत बळेचि खाले/ज्वाला तरी ते वरती उफाळे’ वामन पंडित म्हणून गेले आहेत. अर्थात, त्यांचं हे वचन म्हणजे आपल्याला नेहमी येणाऱ्या अनुभवाचंच नवनीत आहे. आपण नेहमी पाहतो की पेटती ज्योत वरच्या दिशेनेच उडत असते. साधी पेटलेली काडी घेतली आणि हातात उलटी धरली तरी त्याची ज्योत वरच्या दिशेनेच उफाळून येते. बोटं भाजून काढते. साहजिकच हे असं का होतं, हा सवाल त्या ज्योतीसारखाच मनात उफाळून येतो.

इंधनाचे प्रकार आणि त्यांची भूमिका

पोत म्हणजेच मशालीचा पलिता जेव्हा पेटतो तेव्हा त्या पलित्याचं कापडी टोक जरी पेटल्यासारखं वाटलं तरी ते जळत नाही. अगदी आपल्या नेहमीच्या ओळखीची मेणबत्ती घेतली किंवा निरांजनातली वात, तर ती कापसाची वात काही जळत नाही. जळतं ते त्या कापसाला चिकटलेलं मेण किंवा पलित्यात असलेलं तेल. हेच इंधन जळत असतं. इंधन नेहमीच तेलासारखं द्रवरूप असतं असं नाही. तुपासारखं अर्धद्रवरूपात किंवा मेणासारखं घनरूपातही ते असू शकतं; पण ते मुळात कोणत्याही रूपात असलं तरी त्याला उष्णता मिळाली की प्रथम द्रवरूपात आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की वायुरूपात बदलतं.

उष्णता आणि ज्योतीचे उर्ध्वगमन

पाणी कसं घनरूपात म्हणजे बर्फाच्या खड्यात असतं, त्याला उष्णता मिळाली की त्याचं वाहत्या पाण्यात रूपांतर होतं आणि आणखी जास्त उष्णता मिळाली की त्याची वाफ होते. तसंच सगळ्याच पदार्थांची स्थिती असते; पण काही पदार्थ असे असतात, की ते वायुरूपात गेल्यावर आणखी उष्णता मिळाल्यावर पेट घेऊ शकतात. इंधन अशा ज्वालाग्राही पदार्थांचंच असतं.

ज्योत का वरच्या दिशेने उफाळते? (Why flames always rise?)

आता प्रश्न येतो की ज्योत नेहमी वरच का उफाळते? याचं उत्तर विज्ञानात आहे. उष्णतेमुळे हवेतील घटक हलके होतात आणि वरच्या दिशेने जातात. ज्योत जिथं इंधन जळतं, तिथं उष्णता तयार होते. परिणामी, उष्ण हवेच्या प्रवाहाने ज्योत वरच्या दिशेने उफाळते. हेच कारण आहे की ज्योत नेहमी वरच्या दिशेने वाढते, जरी पलिता खालच्या दिशेने धरला तरी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments