तमसा नदीच्या तटावर एकदा नारदमुनी महर्षी वाल्मिकींना भेटायला गेले तेव्हा वाल्मिकींनी मुनींना एक प्रश्न विचारला, कि तुम्ही तिन्ही लोकात वारी करत असतात, तुमच्या नजरेत कुणी मर्यादा पुरुषोत्तम आहे का? नारदमुनींनी हसत होकारातही मान हलवली. ते मर्यादा पुरुषोत्तम दुसरे कुणीही नसून प्रभू रामचंद्र होते. प्रभू रामचंद्र सूर्यवंशाचे ८१ वे वंशज होते. प्रभू रामचंद्राचे ३ भाऊ होते – लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. प्रभू रामचंद्र यांचा सीतेशी विवाह झाल्यावर तब्बल १२ वर्ष ते कैकेये मातेने भेट दिलेल्या कनक भावनात राहत होते. तुम्हाला माहीतच असेल कि, पुत्रप्रेमामुळे कैकेयीने प्रभु रामचंद्रास १४ वर्ष वनवासात पाठवून तिचा पुत्र भरत ह्यास राजगादीवर बसविण्याचे वचन राजा दशरथ ह्यांच्या कडून मागितले.
किंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का, प्रभु राम ह्यांना १४ वर्षाच्याच वनवासास पाठवण्याचे कैकेयीने का ठरविले?
वनवास हा ५ वर्ष, १० वर्ष अथवा १५ वर्ष असा कितीही वर्षाचा असू शकला असता तर मग १४ वर्षच का? ह्याचे उत्तर तुम्हाला भेटेल त्रेतायुगाच्या नियमामध्ये. त्रेतायुगाच्या नियमानुसार जर एखादा राजा अथवा मालकने आपल्या राज्यावर/ जमिनीवर/ संपत्तीवर १४ वर्ष अधिकार दर्शविला नाही तर सदर जागेवरील त्याचा अधिकार निघून जातो. ह्याच नियमाच्या आधारे प्रभू रामचंद्र यांना अयोध्या नगरीवर आपला अधिकार १४ वर्षानंतर दर्शविता न यावा यासाठी कैकेयीने प्रभू रामचंद्र यांना १४ वर्षाचा वनवास सुचविला होता. किंतु रावणाचा वध करून प्रभू राम, लक्ष्मण आणि सीतेसह जेव्हा अयोध्येत आले तेव्हा भरताने बंधुप्रेम दर्शवून राजगादी आपले बंधू श्री. प्रभू रामचंद ह्यांना हवाली केली.