Table of Contents
केंद्र बिंदू म्हणजे काय?
विचार करा जेव्हा तुम्ही एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करता, तेव्हा तुम्हाला किलोमीटर दर्शविणारे दगड रस्त्यात दिसतात. त्यांना माईल स्टोन असे म्हटले जाते. हे माईल स्टोन बघताना तुमच्या मनात हा प्रश्न आला असेलच की हे अंतर नक्की कुठून मोजले जाते. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल हा मुंबईचा झिरो पॉईंट आहे. सेंट थॉमस कॅथेड्रल ही वास्तू मुंबईची जुनी ऐतिहासिक वास्तू असून तिला ग्रेड १ हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. ब्रिटिश काळापासून या चर्चला शहराचा ‘पॉइंट शून्य’ (Zero Mile Stone) मानले जायचे.
भारताचा झिरो माईल स्टोन कुठे आहे?
आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशांमधून भारताचे अंतर जेथून मोजले जाते, त्याला भारताचा झिरो माईल स्टोन असे म्हणतात. भारताचा झिरो माईल स्टोन नागपूर येथे स्थित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे अंतर ह्याच पॉइंटवरून मोजले जाते, म्हणून ह्या स्टोनला फार महत्व आहे. झिरो माईल स्टोन १९०७ मध्ये नागपूर येथे ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया दरम्यान बांधण्यात आला होता. मुळात ह्या प्रकल्पाचा उद्देश भारतातील ब्रिटिश प्रदेशांचे सीमांकन करण्याचा होता. हा असा प्रकल्प होता ज्याअंतर्गत आपल्या महान पर्वतांचे देखील मोजमाप केले गेले.
झिरो माईल स्टोन: नागपूरचे ऐतिहासिक आणि भौगोलिक प्रतीक
झिरो माईल स्टोन हे नागपूरच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्वाचे प्रतिक आहे. ह्या पॉइंटपासून भारताच्या विविध ठिकाणांचे अंतर मोजले जाते आणि त्यामुळे नागपूरचे हे स्थान विशेष महत्वाचे आहे. भारतातील विविध प्रदेशांमधील अंतर आणि त्यांच्या सीमांकनासाठी झिरो माईल स्टोन हे केंद्रीय बिंदू म्हणून काम करतो.
निष्कर्ष
झिरो माईल स्टोन हे नागपूरच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. भारताच्या अंतर मोजणीसाठी हा पॉइंट महत्वपूर्ण भूमिका बजावतो. या ठिकाणाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेतल्यास, आपल्याला भारताच्या भौगोलिक संरचनेचे आणि मोजमाप प्रक्रियेचे महत्व अधिक चांगले समजते.